VIDEO | आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा; सोमवारपर्यंत कामावर रुजु न झाल्यास कारवाई

2021-12-10 0

#राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आंदोलक कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे. सोमवारी कामावर रुजू झाल्यास या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, या मुदतीत कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. संपामुळे आतापर्यंत एसटीचे तब्बल 550 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही. तसेच एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याचा निर्णय तात्काळ घेतला जाऊ शकत नाही. न्यायालयीन समितीच्या अहवालानंतरच याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही अनिल परब यांनी सांगितले.

Videos similaires